Three days' full curfew in Solapur
Three days' full curfew in Solapur 
मुख्य बातम्या

सोलापुरात तीन दिवस संपूर्णपणे संचारबंदी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर शहरात १५ वर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी (ता.२०) आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दुपारपासून ते गुरुवार (ता.२३) रात्री १२ पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. अचानकपणे उदभवलेल्या या परिस्थितीमुळे ग्रीनझोनमध्ये असलेले सोलापूर आता ‘रेडझोन’मध्ये गेल्याचे चित्र आहे. 

सोलापुरात १२ एप्रिलपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, पण त्याचदिवशी किराणा दुकानदाराच्या मृत्यूने एका रुग्णाचा प्रवेश झाला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. त्यानंतर रविवारीच सत्तरफूट परिसरातील एक महिला कोरोनाबाधित आढळली. तिचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर सोमवारी ही संख्या एकाचदिवशी सहाने वाढली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक झाल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहरात संपूर्णपणे संचारबंदीचे आदेश दिले आहेत. 

या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असतील. वैद्यकीय सेवा, खासगी व सरकारी रुग्णालये, डॉक्टर, वैद्यकीय सेवेशी संबंधित वाहने, कर्मचारी, मेडिकल दुकाने यांना या संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा, अग्निशामक दल, वीजपुरवठा या बाबीदेखील अत्यावश्यक सेवा करण्यात आल्या. सकाळी सहा ते नऊच्या आतच दूध वाटप करता येईल. पेट्रोलपंप सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू राहतील. तेही अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन पुरवतील.  भारतरत्न इंदिरानगरची भर 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई होईल. शहरात यापूर्वीच पाच्छा पेठ आणि रविवार पेठेतील जोशी गल्ली हे दोन बफर झोन जाहीर केलेले आहेत. त्यात भारतरत्न इंदिरानगरची आता भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रीनझोनमध्ये असलेले सोलापूर आता रेडझोनमध्ये आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT