नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात  
मुख्य बातम्या

नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात

टीम अॅग्रोवन

नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, प्रत्येकाने ती स्वत: लावावी अन् जबाबदारीने त्यांचे संगोपन करावे. याचा याचा राज्यभर प्रचार करणार आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले.  नाशिक महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवार (ता. २०) करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी होते.व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांची उपस्थिती होती.  महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुष्पोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमात महापालिकेविरोधात घोषणाबाजी पुष्पोत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऐन उद्‍घाटन समारंभ सुरू होण्यावेळीच महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. यावर आपण स्वतः येवल्यात भुजबळ यांना निमंत्रण दिले होते; पण, ते येऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यामुळे पत्रिकेत नाव टाकले नाही, असे उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT