Three and a half crores of rupees of 'Pokra' in Parbhani Grants are exhausted
Three and a half crores of rupees of 'Pokra' in Parbhani Grants are exhausted 
मुख्य बातम्या

परभणीत‘पोकरा’चे साडेतीन कोटी रूपयांवर अनुदान थकले

टीम अॅग्रोवन

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गंत सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यतील २ हजार ४९६ लाभार्थींना विविध घटकांसाठी ५ कोटी ५० लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले. परंतु, अद्याप १ हजार १५३ लाभार्थींचे ३ कोटी ६२ लाख ६४ हजारांवर रुपयांचे अनुदान अद्याप थकलेले आहे. कामे पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला आहे. सद्यस्थितीत आर्थिक अडचणी असल्यामुळे अनुदानाची रक्कम तत्काळ द्या, अशी मागणी पात्र लाभार्थींनी केली. 

‘पोकरा’अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेततळे, फळबाग लागवड, बिजोत्पादन, शेडनेटगृह, विद्युत पंप, पाईप लाईन, व्हर्मी कंपोस्ट, भूमीहिन शेतमजुरांनी शेळीपालन अशा विविध घटकांसाठी ८९ हजार २७१ प्रस्ताव सादर केले होते. कामे पूर्ण केलेल्या २ हजार ४९६ लाभार्थींना ५ कोटी ५० लाख रुपये अनुदानाची दिली गेली. परंतु, अद्याप १ हजार १५३ लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा आहे. परभणी तालुक्यातील २०५ शेतकरी लाभार्थींचे ४७ लाख ४८ हजार ६०८ रुपये अनुदान थकले आहे. 

जिंतूर तालुक्यातील १०७ शेतकरी लाभार्थींचे ५९ लाख ६५ हजार ९०१ रुपये, सेलू तालुक्यातील १८६ लाभार्थींचे ६० लाख ३५ हजार ९४७ रुपये, मानवत तालुक्यातील ७७ लाभार्थीचे २१ लाख १६ हजार २८५ रुपये, पाथरीतील २५८ लाभार्थींचे ८० लाख ९० हजार ३१४ रुपये अनुदान थकले आहे. सोनपेठ तालुक्यातील ४३ लाभार्थींचे ७२ हजार ८१ रुपये, गंगाखेडमधील ७७ लाभार्थींचे १२ लाख २५ हजार ९ रुपये, पालममधील ५९ लाभार्थींचे १७ लाख ९१ हजार १८५ रुपये, पूर्णा तालुक्यातील १४१ लाभार्थींचे ६२ लाख १८ हजार ६८७ रुपये अनुदान थकले आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT