नापेर क्षेत्र
नापेर क्षेत्र  
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेर

टीम अॅग्रोवन

अकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका बसला असून जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन नापेर राहिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. हे क्षेत्र आता आगामी रब्बी हंगामात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात अपुरा तसेच अनियमित पाऊस झाल्याने झालेल्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर काहींनी दुबार पेरणी करूनही पिके साधली नव्हती. परिणामी खरीप लागवड क्षेत्र नापेर राहिले. जुलैच्या शेवटी तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या चालल्या. आता ही पिके जेमतेम वाढलेली दिसून येत आहेत. अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात प्रामुख्याने कटीयार, म्हैसांग, अंबिकापूर, कपिलेश्वर, आपातापा, आपोती आदी गावशिवारात हजारो हेक्टर शेती तशीच पडून राहिली. जिल्ह्यात प्रामुख्याने अकोला, मूर्तिजापूर, पातूर या तालुक्यांमध्ये निर्धारित लक्ष्यापर्यंत पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या.  अकोल्याचे सरासरी क्षेत्र एक लाख ६२८० हेक्टर आहे. यावर्षी ८७०९० हेक्टरवर पेरणी झाली. जवळपास २० हजार हेक्टर खरीप क्षेत्र नापेर राहिले. मूर्तिजापूरमध्ये ७३६३३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६४ हजार हेक्टरवर लागवड झाली. तर पातूरमध्ये ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४०३२९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. या तीनही तालुक्यांमध्ये सरासरीच्या ९० टक्केही क्षेत्र लागवडीखाली आलेले नाही. पावसाच्या खंडामुळे पेरणी झालेली पिके मोडून टाकण्याची स्थिती संपूर्ण मूर्तिजापूर तसेच अकोला तालुक्यातील काही मंडळात निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या करूनही पुरेशा ओली अभावी पिके टिकली नव्हती. शेतकऱ्यांनी सरळ नांगर फिरवला. जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यापासून पाऊस कसर भरून काढत आहे. सध्या रब्बीच्या दृष्टीने हा पाऊस चांगला ठरणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात हरभऱ्याची लागवड जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता आहे.  अकोला जिल्ह्याचा खरीप दृष्टिक्षेप

सरासरी ४८०५८६
लागवड  ४१९४०१
टक्केवारी ८७

प्रमुख पिकांची लागवड

तूर   ५०९०८ हेक्टर
मूग     १९२८५
उडीद    १३९७३
सोयाबीन    १७०८५८
कापूस   १५४४३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT