औरंगाबाद : ढवळापूरी शिवारातील शेतात रोटावेटरच्या सहाय्याने कपाशी नष्ट करणे सुरू आहे.
औरंगाबाद : ढवळापूरी शिवारातील शेतात रोटावेटरच्या सहाय्याने कपाशी नष्ट करणे सुरू आहे. 
मुख्य बातम्या

फरदड घेऊ नका म्हणण्याची उरली नाही वेळ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या विनाशकारी आक्रमणानंतर यंदा नोव्हेंबरपासूनच कपाशीचे पीक काढून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बोंड अळीचे आक्रमण रोखण्यासाठी कपाशीचे पीक शक्‍य तितक्‍या लवकर काढून टाकण्याचे आवाहन कृषीच्या यंत्रणेसह तज्ज्ञांनी आधीच केले आहे. त्यामुळे फरदड घेऊ नका म्हणण्याची गरज यंदा पडणार नाही, असेच काहीसे चित्र कपाशीबाबत आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवालानुसार औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा १५ लाख ९३ हजार ९२७ शेतकऱ्यांनी १० लाख ४८ हजार ५३९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. हे सर्वच्या सर्व क्षेत्र बोंड अळीने बाधित झाले आहे.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांतील ४८ तालुक्‍यात यंदा ५ लाख ४३ हजार ७०५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. यामध्ये लातूर जिल्ह्यातील त्यापैकी ४ लाख ७६ हजार ४४ हेक्‍टर क्षेत्र बोंडअळीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने त्याचा थेट परिणाम कपाशीच्या उत्पादनावर झाला.

पहिल्या दुसऱ्या वेचणीनंतर शेतकऱ्यांना कपाशीची वेचणीच करण्याची गरज उरली नसून, कपाशीला बोंड दिसत असले तरी ते अळ्यांचा प्रादुर्भाव झालेलेच असल्याने वेचणीच्या खर्चाला परवडणारी नाहीत. त्यामुळे कपाशीचे पीक काढून ते नष्ट करत त्याऐवजी शक्‍य असल्यास रब्बीचे पीक घेण्याचा पर्याय निवडताना शेतकरी दिसत आहेत.

सव्वादोन लाखांवर तक्रारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवालानुसार जवळपास सव्वादोन लाखावर शेतकऱ्यांनी त्यांच्या कपाशीच्या पिकात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारींपैकी जवळपास बावीसशे हेक्‍टरवर कपाशी पिकाच्या नुकसानीची तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. या आकड्यांमध्ये सातत्याने भरच पडते आहे.

कपाशीचे पीक नष्ट करताहेत ही समाधानाची बाब आहे. पुढच्या हंगामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते पाऊल आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाचा कंपोस्ट वा कांडी कोळसा करण्यावर भर द्यावा. पिकात थेट रोटावेटर मारण्याचे टाळावे. - डॉ. नितीन पतंगे, कीटकशास्त्रज्ञ एनएआरपी औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT