कोल्हापुरात दूधदरात कपात नाही
कोल्हापुरात दूधदरात कपात नाही 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात दूधदरात कपात नाही

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून उत्पादकांसह दूध संघ अडचणीत आलेले असले, तरी अद्याप कोणत्याही दूध संघांनी दुधाच्या दरात कपात केलेली नाही. परंतु अशीच स्थिती राहिल्यास राज्यातील इतर दूध संघांचा अंदाज पाहून जिल्ह्यातही दूधदर कपातीची भीती व्यक्त होत आहे. काही दूध संघांची विक्री दर वाढविण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. जोपर्यंत राज्यातील इतर दूध संघांकडून नेमका निर्णय होत नाही, तोपर्यंत दुधाच्या दरात घट होण्याची शक्‍यता नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

जिल्ह्यात सुमारे चौदा ते पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन होते. यापैकी गोकुळ, वारणा आदी दूध संघ दूध संकलनात अग्रेसर आहेत. दूध दराबाबत आंदोलन झाल्यानंतर दूध संघांनी दरात वाढ केली. यानुसार गोकुळ व वारणा दूध संघ गायीसाठी ३.५ फॅटला २५ रुपये खरेदी, दर निश्‍चित केले आहेत. इतर भागातील दूध दरापेक्षा जिल्ह्यातील दूध दर एक ते दोन रुपयांनी जादा असतो. आंदोलनापूर्वी २३ रुपये दर होता. अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर हा दर अनेक दूध संघांनी २५ रुपयांवर आणला. विशेष करुन सहकारी संघांमध्ये दुधासाठी स्पर्धा असल्याने संघांना एकसारखे दूध दर ठेवावे लागतात.

चार महिन्यांपूर्वी दूध दर आंदोलनात तोडगा निघाल्यानंतर दूध संघांनी २५ रुपयाचा फॉर्म्युला कायम ठेवला. राज्यात अनुदान मिळत नसल्याने इतर दूध संघाची अवस्था बिकट होण्याची शक्‍यता आहे. यामुळे अनेक दूध दर कपातीचे धोरण सुरू असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी तातडीने दर कमी करण्याबाबतच्या हालचाली नाहीत. काही मातब्बर दूध संघानी विक्री दर वाढवून ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दूध संघ अडचणीत आले असले तरी अद्याप तरी आम्ही दुधाच्या खरेदी दरात कपात केलेली नाही. भविष्यातील घडामोडीवरच याबाबतचा निर्णय अवलंबून असणार आहे. - अर्चना करोशी, दूध संकलन अधिकारी वारणा दूध संघ

गेल्या काही दिवसांत चाऱ्यासह अन्य काही गोष्टींचा खर्चही वाढला आहे. जर दरकपात झाली, तर मात्र जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही. - प्रदीप पाटील, दुग्धोत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT