There is no purchase of soybean at guarantee centers in Nagar district
There is no purchase of soybean at guarantee centers in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात हमीभाव केंद्रांवर सोयाबीन खरेदीच नाही

टीम अॅग्रोवन

नगर : बाजारात व्यापारी हमी दरांपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करत आहे. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनची हमी दराने खरेदी करण्यासाठी नाफेडकडून खरेदी केंद्रे सुरु केली. जिल्ह्यात मात्र यंदा शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करण्याला अप्रत्यक्ष नकारच दिला असल्याचे दिसत आहे.

११ केंद्रांवर महिनाभरात एकही क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली नाही. मुगाची अवघी १२८६ क्विंटल, तर उडदाची ९६ क्विंटलची खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रे सुरु होऊनही खरेदी नसल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. 

शेतमालाची हमी दराने खरेदी करण्यासाठी यंदा नगर, राहुरी, जामखेड, खर्डा, टाकळी खांडेश्वरी (कर्जत), शेवगाव, पारनेर, पाथर्डी, कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर या ठिकाणी ११ खरेदी केंद्रे सुरु केली. शेतमाल विक्री करण्यासाठी आधी ऑनलाइन नोंदणी करावी लागते.

यंदा सुरवातीला उडीद व मुगाची नोंदणी सुरु केली. जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर उडीद, ६० हजार हेक्टरवर मुगाची उत्पादन घेतले. त्यामुळे मूग, उडदाची मोठी खरेदी होईल, असा अंदाज होता. मात्र फारसा प्रतिसाद दिला नाही. 

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर केंद्रावर ७७ शेतकऱ्यांनी ४४४ क्विंटल व राहुरी केंद्रावर ६७ शेतकऱ्यांनी २८० क्विटंल, कर्जत केंद्रावर ९४ शेतकऱ्यांनी ५६१ क्विंटल अशी २३८ शेतकऱ्यांनी १२८६ क्विंटलची विक्री केली. ६२१ शेतकऱ्यांनी  नोंदणी केली आहे. उडदाची राहुरी केंद्रावर १६ शेतकऱ्यांनी ९६ क्विंटलची खरेदी झाली.

सोयाबीनची जामखेड, पाथर्डी व शेवगाव येथील केंद्रावर प्रत्येकी एक, नगरला सात, पारनेरला ५, राहुरीला १९ अशी केवळ ३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र अजून एक क्विंटलही खरेदी झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरवली. बाजारात हमीदराएवढेच  दर मिळत असल्याने शेतकरी हमी केंद्राकडे येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT