गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही
गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही 
मुख्य बातम्या

सांगलीच्या गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही

टीम अॅग्रोवन

सांगली ः बाजार समितीतील नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केलेली तूर केंद्रीय गोदामांमध्ये २१०० टन शिल्लक आहे. यामुळे गोदामांमध्ये चालू हंगामातील हमीभावाने खरेदी करावयाची सोयाबीन, उडीद आणि मूग ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केंद्र सांगलीला सुरू केले जाते. गेल्या वर्षीही सांगलीतील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद, मुगाची हमीभावाने विक्री केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वीची ७०० टन तूर तर गेल्यावर्षीची १४०० टन तूर अजून केंद्रीय गोदामांमध्ये पडून आहे. या तुरीची खरेदी मिलने केलेली नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र सांगलीत सुरू केले. तर खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगली येथे सुरू होणारे खरेदी केंद्र हे विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात उडिदाची १५ हजार १३३ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. तर सोयाबीनचा ३८ हजार ८७० हेक्‍टरवर पेरणी झाली. सध्या जिल्ह्यात आगाप पेरणी केलेली सोयाबीनची काढणी सुरू आहे. मात्र, हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्‍न उपस्थित करू लागले आहे.

खरेदी संघाद्वारे हमीभाव केद्रांसाठी प्रस्ताव जिल्ह्यात सांगली, विटा आणि तासगाव या तीन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र, या तिन्ही खरेदी संघाद्वारे हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी मिळालेली नाही, असे असताना सांगलीतील केंद्रीय गोदामांमध्ये शेतीमाल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. तर खरेदी केंद्र कुठे सुरू करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT