मुख्य बातम्या

यवतमाळ 36.5 अंशांवर

sandeep navale

पुणे : हवेतील बाप्ष कमी होत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.6) सकाळपर्यंत विदर्भातील यवतमाळ येथे कमाल तापमान 36.5 अंशांपर्यंत पोचले होते. दुपारी पुण्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरू झाला असून, वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागले आहेत. त्यातच दक्षिणेकडील कमाल तापमान हळूहळू वाढू लागले आहे; परंतु काही भागांत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. शुक्रवारी (ता.6) सकाळपासून कडक ऊन पडले होते. त्यामुळे दुपारी कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती. दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मराठवाडा; तर विदर्भात अनेक ठिकाणी सकाळपासून ऊन पडल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. रात्रीच्या किमान तापमानातही घट झाली असून औरंगाबादमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी कमी होऊन 15.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

येत्या सोमवारपर्यंत (ता.9) गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी येत्या मंगळवारपर्यंत (ता.10) हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 34.1, जळगाव 35.4, कोल्हापूर 33.0, मालेगाव 35.8, नाशिक 33.0, सांगली 33.9, सातारा 31.8, सोलापूर 34.5, मुंबई 32.8, सांताक्रुझ 34.7, अलिबाग 32.4, रत्नागिरी 31.8, औरंगाबाद 34.0, परभणी 34.8, अकोला 35.6, अमरावती 30.4, चंद्रपूर 34.2, गोंदिया 33.4, नागपूर 33.6, वाशीम 34.0, वर्धा 32.5, यवतमाळ 36.5

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT