उन्हाचा चटका कायम; ब्रह्मपुरी ४०.२ अंशांवर
उन्हाचा चटका कायम; ब्रह्मपुरी ४०.२ अंशांवर 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका कायम; ब्रह्मपुरी ४०.२ अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भात आज (ता. १४) हलक्या पावसाला पोषक हवामान असून, उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या स्थितीपासून मराठवाडा, उत्तर कर्नाटकापर्यंत ९०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाचा पुरवठ्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. बुधवारी दुपारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यात अंशत: ढगाळ हवामान होते. उद्या (ता. १४) विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, परभणी, अमरावती, चंद्रपूर येथे तापमान ३९ अंशांच्या वर तर सांगली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, यवतमाळ ३८ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.  बुधवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१६.०), जळगाव ३६.० (१८.२), कोल्हापूर ३६.३ (२१.७), महाबळेश्वर ३१.९ (१६.५), मालेगाव ३५.२ (१८.८), नाशिक ३४.३ (१६.४), सांगली ३८.० (१८.७), सातारा ३६.० (१८.३), सोलापूर ३९.६ (२३.१), अलिबाग २८.५ (२०.७), डहाणू २९.७ (१९.०), सांताक्रूझ ३०.८ (२०.०), रत्नागिरी ३०.२ (२१.४), औरंगाबाद ३५.७ (२०.०), बीड ३८.४ (२०.२), नांदेड ३८.५ (२३.०), उस्मानाबाद ३८.१ (२२.०), परभणी ३९.० (२२.५), अकोला ३७.८ (२१.०), अमरावती ३९.८ (२१.०), बुलडाणा ३४.० (२१.८), चंद्रपूर ३९.६ (२७.०), गडचिरोली ३५.४ (२२.०), गोंदिया ३६.० (१५.९), नागपूर ३८.५ (१९.९), वर्धा ३८.५ (१९.९), वाशीम ३६.२ (२०.४), यवतमाळ ३८.५ (२२.८). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT