राज्यात उन्हाचा चटका वाढला
राज्यात उन्हाचा चटका वाढला 
मुख्य बातम्या

राज्यात उन्हाचा चटका वाढला

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून उर्वरीत राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे.   राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. विदर्भात ढगाळ हवामान, पावसामुळे घसरलेला पारा पुन्हा पुन्हा वर सरकला आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. सोलापूर, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशाच्या वर गेले आहे. तर जळगाव, परभणी, वर्धा येथे ३२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. रात्रीच्या किमान तापमान सरासरीच्या खाली असले तरी त्यात वाढ झाली आहे.  मॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. रविवारी सकाळपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरीत राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. पावसाला पोषक हवामान नसल्याने पावसाची उघडीप कायम राहणार आहे. आज (ता. १०) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी एखाद दुसरी पावसाची सर पडण्याचा अंदाज आहे. तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   रविवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.३ (१८.६), जळगाव ३२.६ (२०.४), कोल्हापूर २८.९(१९.५), महाबळेश्‍वर १९.०(१५.२), मालेगाव ३१.०(२१.४), नाशिक २७.५(१९.५), सांगली ३०.०(१८.१), सातारा २८.१(१९.५), सोलापूर ३३.० (२०.१), सांताक्रुझ ३१.१(२३.९), अलिबाग ३१.७(२४.३), रत्नागिरी २९.३(२२.७), डहाणू ३०.३(२५.४), आैरंगाबाद ३०.७ (१८.६), परभणी ३२.३(१९.५), नांदेड ३०.०(२२.०), अकोला ३२.४२(२०.०), अमरावती ३०.८(१९.४), बुलडाणा २९.२ (१८.८), चंद्रपूर ३३.६ (२१.४), गोंदिया ३०.०(२२.५), नागपूर ३१.४(२०.३), वर्धा ३२.०(१९.९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT