राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर 
राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर  
मुख्य बातम्या

राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर 

वृत्तसेवा

पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. ९) निफाड येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र पावसाने उघडीप देताच राज्यात थंडी परतली असून, गारठ्यात वाढ झाली आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरले आहे. पहाटेच्या वेळी धुके पडण्यासही सुरुवात झाली आहे,. निफाड पाठोपाठ पुणे येथे १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.   

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३०.५ (१२.७), नगर ३१.४ (१४.७), जळगाव ३२ (१३), कोल्हापूर ३०.७ (१८.५), महाबळेश्‍वर २५ (१४.१), मालेगाव ३१.४ (१८.६), नाशिक २८.९ (१३.४), निफाड २९.४ (१२.५), सांगली ३२.२ (१७), सातारा ३०.५ (१८.१), सोलापूर ३३.३ (१५.०), सांताक्रूझ ३५.३ (२०.२), डहाणू ३४.६ (२१), रत्नागिरी ३४.२ (२१.२), औरंगाबाद ३०.२ (१३.६), नांदेड ३२.८ (१५.९), उस्मानाबाद - (१६), परभणी ३०.२ (१४.८), अकोला ३२.४ (१५.८), अमरावती ३१.६ (१५.३), ब्रह्मपुरी ३३.५ (१६.२), बुलडाणा ३०.२ (१५.६), चंद्रपूर ३१.८ (१६.४), गडचिरोली ३१.४ (१५.४), गोंदिया ३१ (१३), नागपूर ३१.५ (१४.४), वर्धा ३१ (१४.९), वाशीम ३२ (१४), यवतमाळ ३०.५ (१४.५). 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र  दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. पूर्वमध्य अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT