Heatwave
Heatwave 
मुख्य बातम्या

अकोला होरपळले; तापमान ४२ अंशांवर, तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे: पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. उन्हाचा चटका वाढला असताना, दुपारनंतर ढगाळ हवामान होऊन अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज (ता.१३) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा चटकाही कायम राहणार आहे. रविवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये तापमान हंगामातील उच्चांकी ४२ अंशांवर पोचल्याने अकोल्यात होरपळ वाढली आहे.     राज्यात कमाल तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान सातत्याने ३७ अंशांच्या पुढे आहे. रविवारी सकाळपर्यंत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. गुजरात राज्यात उष्णतेची लाट आली असून, राज्यातही उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे.  शनिवारी (ता.११) सायंकाळनंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, हवेली, खेड, शिरूर तालुक्याच्या काही भागात, तर नगर जिल्ह्यातील कर्जत आणि पारनेर तालुक्यात आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. उत्तर कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्यप्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे आज (ता.१३) राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्हे व पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, जळगाव ४१.४, धुळे ४१.६, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३२.८, मालेगाव ४०.६, नाशिक ३९.१, निफाड ३७.२, सांगली ३७.२, सातारा ३८.२, सोलापूर ३९.४, डहाणू ३३.६, सांताक्रूझ ३४.८, रत्नागिरी ३३.७, औरंगाबाद ३८.२, बीड ४०, परभणी ४०.०, नांदेड ४०.०, अकोला ४२.०, अमरावती ४०.०, बुलडाणा ३८.६, चंद्रपूर ४०, गोंदिया ३९.०, नागपूर ४०.३, वर्धा ४०.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT