अकोल्यात रविवारी राज्यव्यापी  ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद’
अकोल्यात रविवारी राज्यव्यापी ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद’ 
मुख्य बातम्या

अकोल्यात रविवारी राज्यव्यापी ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद’

टीम अॅग्रोवन

अकोला ः सद्यःस्थितीत तरुण होत चाललेल्या देशातील ‘जनसंख्येला काम- बुद्धी व घामाला दाम’ मिळणे सर्वांत मोठे आव्हान झाले आहे. तंत्रज्ञानामुळे जग हे वैश्विक खेडे बनले असताना स्पर्धेशिवाय पर्याय नसून, उपलब्ध संसाधनांना तंत्रज्ञानाची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (ता. २०) शहरातील आयएमए सभागृहात ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यापुढेही कष्टकऱ्यांना स्पर्धाक्षम होऊन सुखासमाधानाने जगता यावे, यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावरील देशातील अनाठायी बंधने हटणे गरजेचे आहे, त्याकरिता अकोल्यात सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय स्तरावरील विशेष मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सृजनात्मक शक्तीला तंत्रज्ञानाच्या चिंतनाचे जोड देण्यासाठी ही परिषद होत आहे. परिषदेला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडी अध्यक्ष गीताताई खांदेभराड, माजी अध्यक्ष गुणवंत हंगरकेकर, अॅड. दिनेश शर्मा, डाॅ. अजित नरदे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात तंत्रज्ञानविषयक चर्चा होणार असून, या चर्चेत तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. विलास पारखी, डॉ. शिवेंद्र बजाज, डॉ. दत्तात्रय शिरोळे, डॉ. सुभाष थेटे, डॉ. वृषाली बेडसे मार्गदर्शन करणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT