'Teachers door to students' campaign in Pune district
'Teachers door to students' campaign in Pune district 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी आता ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक स्वतः गृहभेटी देऊन मंदिर, चावडी, मैदानावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.

मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंधरा जूनपासून २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु ग्रामीण भागासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या वाढत असलेला आरोग्याचा प्रश्न तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. तसेच भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. शिक्षकांना शाळेत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. तर दुर्गम भागात आणि डोंगरी भागात नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्याबाबत जिल्हा परिषदेने शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये शिक्षकांनी दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण द्यायचे आहे. ज्या ठिकाणी पाच ते दहा विद्यार्थी आहेत. त्यांना एकत्र करून गावातील मंदिर, मोकळे मैदान, ओसरी अशा ठिकाणी सुरक्षित अंतराचे नियम पाळून शिक्षण द्यावे.

वेळप्रसंगी एकच विद्यार्थी असेल तर त्यांच्या घरी जाऊन शिकवणे, गृहपाठ देणे आणि आठवड्याला त्याने अभ्यास केला की नाही हे तपासणे, अशा सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत हा उपक्रम सुरू होणार आहे. - रणजित शिवतरे, सभापती, शिक्षण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT