Tapi, Waghur, Girna rivers flooded again
Tapi, Waghur, Girna rivers flooded again 
मुख्य बातम्या

तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूर

टीम अॅग्रोवन

जळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तापी, गिरणा, वाघूर नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. नद्यांच्या उगमक्षेत्रात पाऊस झाल्याने हा पूर आला. 

वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग मंगळवारी (ता.२१) सुरू झाला. यामुळे नदीला पूर आला. तापी नदीच्या उगमक्षेत्रातही पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. 

गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झालेला नसला तरी गिरणा नदीत मन्याड, जामदा बंधाऱ्यातून पाणी येत आहे. नदीचे लाभक्षेत्र असलेल्या भडगाव, पाचोरा, चाळीसगावच्या अनेक भागांत गेल्या तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला. यामुळे नदीला पुन्हा पूर आला आहे. या शिवाय इतर लहान नद्यांमध्ये देखील प्रवाही पाणी आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठण्याच्या स्थितीत आहे. धुळे व नंदुरबारातही पाऊस सरासरीपर्यंत पोहोचला आहे.

चाळीसगाव तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी बाराला सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत  सुरूच होता. 

दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन काही वेळ अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. डोंगर पट्ट्यातही बराच वेळ पाऊस झाला. त्यामुळे काही वेळातच शहरातून वाहणाऱ्या नदीला पाणी वाढले होते. त्यामुळे ३१ ऑगस्टला झालेल्या पावसाची आज पुन्हा आठवण झाली.

दरम्यान, पावसाचा जोर वाढत राहिल्यास संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या रहिवाशांसह गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.  खानदेशातील धुळ्यात मालनगाव, सोनवद, पांझऱा, जळगावमधील बहुळा, मन्याड, बोरी, तोंडापूर, वाघूर, मंगरूळ, सुकी, अभोरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT