संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना आव्हान

वृत्तसेवा

तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत २०१७ मध्ये १०० दिवस आंदोलन केले. आता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात १११ शेतकऱ्यांना उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तमिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी. अय्यकन्नू यांनी शनिवारी (ता. २३) ही माहिती दिली. 'नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटर-लिंकिंग फार्मर्स असोसिएशन' या संघटनेचे अय्यकन्नू हे अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात करून त्या पूर्ण कराव्यात, या हेतूने उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. शेती उत्पादनांना फायदेशीर किंमत देण्याचीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिले, तर आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेऊ, पण जर तसे झाले नाही, तर मोदींविरुद्ध लढण्याचा आमचा निर्णय कायम राहील, असे ते म्हणाले. या निर्णयाला सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांचा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीचाही पाठिंबा असल्याचे अय्यकन्नू यांनी सांगितले. "तुमच्या मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्याची मागणी भाजपकडेच का करीत आहात. कॉंग्रेससह अन्य पक्षांकडे तुम्ही ही मागणी का करीत नाहीत, या प्रश्‍नाला उत्तर देताना अन्नकन्नू म्हणाले, की भाजप अजूनही सत्तेत आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत. द्रमुक आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमसारख्या पक्षांनी संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. आम्ही भाजप किंवा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आणि आमचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करीत आहोत. भाजप अजूनही असे आश्‍वासन देत नसल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. वाराणसीला जाण्यासाठी ३०० शेतकऱ्यांचे रेल्वेचे तिकीट काढलेले आहे. तिरुवन्नमलाई, तिरुचिरापल्लीसह काही जिल्ह्यांतील शेतकरी वाराणसीला पोचतील. तमिळनाडूतील भाजपचे एकमेव खासदार पॉन राधाकृष्णन यांनी आमच्या मागण्यांदर्भात आश्‍वासनाचा उल्लेख जाहीरनाम्यात करण्याची ग्वाही दिली, तरी निवडणुकीच्या निर्णयावर आम्ही फेरविचार करू. - पी. अय्यकन्नू, तमिळनाडूतील शेतकरी नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT