Taluka wise team for Agriculture Revitalization Week: Dr. Pawar
Taluka wise team for Agriculture Revitalization Week: Dr. Pawar 
मुख्य बातम्या

कृषी संजीवनी सप्ताहासाठी तालुकानिहाय टीम ः डॉ. पवार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘कृषी संजीवनी सप्ताहासाठी प्रत्येक तालुकानिहाय शास्त्रज्ञ आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली आहे,’’ अशी माहिती डॉ. सहयोगी संचालक संशोधन तथा विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीतंर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प औरंगाबाद, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त  कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम १ ते ७ जुलै  दरम्यान आयोजित केला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. 

आंबेगाव व अंबेलोहल येथे कापूस, मका पिकाची पाहणी करून उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले,‘‘पिकांची फेरपालट, कापूस व मका पिकामधील खत व्यवस्थापन, खते पेरून द्यावे. नत्र खताचा वापर पिकांच्या गरजेनुसार करवा. कीड नियंत्रण  एकात्मिक पद्धतीने करवे. उत्पादन खर्चामध्ये बचत करण्यासाठी  निंबोळी अर्क, जैविक कीटकनाशक फवारणी करावी. मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी, कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी यांचे निरीक्षण करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.’’ 

डॉ. तुकाराम मोटे यांनी ‘रुंद सरी वरंबा’ पद्धतीने पेरणी व आंतरपीक पद्धती, मुल स्थानी जलसंधारण, यांत्रिकीकरण वापर. पोकरा प्रकलपग्रस्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गजेवार आदी  उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT