संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पंढरपूर विकास आराखड्यावरील हरकतींची सुनावणी घ्या

टीम अॅग्रोवन

सोलापूर : पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व सूचना, हरकतींची सुनावणी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तज्ज्ञ सदस्य नगररचनाचे निवृत्त उपसंचालक एस. व्ही. सुर्वे, निवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण, श्रीकांत जहागिरदार उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, "पंढरपूर विकास प्राधिकरण आराखड्यासंदर्भात मुदतीत ५८० आणि मुदतीनंतर ५५६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी.

प्राधिकरणामार्फत विकास योजना राबविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी प्राधिकरणाच्या सदस्यांनी रस्त्यांची, जागेची पाहणी करून तसा अहवाल प्राधिकरणास सादर करावा.

आवश्‍यक असणाऱ्या रस्त्यांची कामे घेण्यास प्राधान्य द्यावे. सर्व गावातील रेडीरेकनर उपलब्ध करून घ्यावा. भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याबाबत आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या सूचनांचाही विचार करावा.''

हरकतींवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार प्रशासनाकडे आलेल्या ५८० हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यालयात ३, ४, १० व ११  मार्चला घेण्यात येणार आहे.मुदतीनंतर प्राप्त झालेल्या ५५६ हरकतींची सुनावणी २३, २४ व २५ मार्चला उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. नाळे यांनी बैठकीत दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT