छावणीतील जनावरांची काळजी घ्या : पालकमंत्री देशमुख
छावणीतील जनावरांची काळजी घ्या : पालकमंत्री देशमुख 
मुख्य बातम्या

छावणीतील जनावरांची काळजी घ्या : पालकमंत्री देशमुख

टीम अॅग्रोवन

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन जगविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. छावणी चालकांनीही छावणीतील जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी मंगळवेढ्यासह सांगोला तालुक्‍यातील चारा छावण्यांना भेटी दिल्या. 

सांगोल्यातील यलमार मंगेवाडी, अजनाळेसह मंगळवेढा तालुक्‍यातील भाळवणी, जालीहाळ, हाजापूर, गोणेवाडी, खुपसंगी, लेंडवे चिंचाळे येथील जनावरांच्या छावणीस व वाळलेल्या डाळिंब, द्राक्ष फळबागास भेट देऊन छावणीतील पशुपालकांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे, औदुंबर वाडदेकर, श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, नामदेव जानकर, राजेंद्र सुरवसे, मधुकर चव्हाण, तलाठी बाळासाहेब कोळी, कृषी सहायक मंगेश लातूरकर, नानासाहेब मोरे आदी उपस्थित होते. 

जनावरांच्या छावणीत चारापाणी मिळते का, याची त्यांनी पाहणी केली. याशिवाय दिल्या जाणाऱ्या चाऱ्याची व पशुखाद्याची तपासणी करत पशुखाद्याचे वितरण करण्यात आले.

वाडीवस्तीवर रस्ता नसल्याने टॅंकरचे पाणी मिळत नाही. तात्पुरत्या स्वरूपात रस्ता देण्याचे तहसीलदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. मधुकर चव्हाण यांनी पीकविमा भरपाई देताना तुरीची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. सारवडे यांनी कांद्याचे अनुदान देण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT