चारा पिकांवरील लष्करी अळीवर उपाययोजना करा ः डॉ. ढवण
चारा पिकांवरील लष्करी अळीवर उपाययोजना करा ः डॉ. ढवण 
मुख्य बातम्या

चारा पिकांवरील लष्करी अळीवर उपाययोजना करा ः डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

परभणी ः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेमुळे यंदा कपाशीचे नुकसान कमी झाले; परंतु सध्या कापसाला चांगला भाव मिळत असल्‍यामुळे पाणी उपलब्ध असलेले शेतकरी कपाशीला पाणी देऊन फरदडचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे परत येत्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये. उपलब्ध पाण्यावर दुष्‍काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्‍यासाठी चारापिकांची लागवड करावी. ज्वारी, मका आदी चारा पिकांवरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. दुष्‍काळाचा सामना करण्‍यासाठी कृषी तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.   

कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्‍त्र विभाग यांच्यातर्फे विविध पिकांवरील कीड - रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत मंगळवारी (ता. २०) कृषी विद्यापीठामध्ये लातूर कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जिल्‍हा समन्‍वयक यांच्‍यासाठी हवामान बदलानुसार सद्यपरिस्थितीत पिकांवरील कीड व रोग व्‍यवस्‍थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षस्थानी डाॅ. ढवण होते.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, लातूर कृषी विभागाचे सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे (परभणी), आर. बी. चलवदे (नांदेड), विजय लोखंडे (हिंगोली), डी. जी. मुळे (लातूर), श्री. घाडगे (उस्मानाबाद), कीटकशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री. जगताप म्हणाले, विद्यापीठाकडील कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍याची जबाबदारी कृषी विभागाची आहे.

या कार्यशाळेत अमेरिकन लष्‍करी अळी, हुमणी अळी व्‍यवस्‍थापन, तूर, हरभरा कीड-रोग व्‍यवस्‍थापन, सद्यःस्थितीतील पिकांचे व्‍यवस्‍थापन आदी विषयांवर डॉ. पी. आर. झंवर, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर, डॉ. एस. डी. बंटेवाड, डॉ. के. टी. आपेट आदींनी सविस्‍तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. झंवर यांनी तर सागर खटकाळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT