Symbolic Holi of Urad crop at Akot
Symbolic Holi of Urad crop at Akot 
मुख्य बातम्या

अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळी

टीम अॅग्रोवन

अकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी व सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत समाज क्रांती आघाडीने अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळी केली. शासनाने मदत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांनी दिला.

प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातचे पीक उद्ध्वस्त झाले असून त्यांना आता पुढल्या पिकाची चिंता निर्माण झाली आहे. उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह विविध पिकांचे नुकसान झाले असून सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे.

शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी कर्ज लवकर मिळावे यासाठी सरकारने बँकांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. उडीद पिकाची होळी करताना पिंप्राळे यांच्यासह अकोट तालुकाध्यक्ष रहीम कुरेशी, श्रीराम पिंप्राळे, शेख आसद, रामदास येले, शेख अशफाक, रामदास पिंप्राळे, माधव भारसाकळे, इरशाद सौदागर आदी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT