रविकांत तुपकर
रविकांत तुपकर 
मुख्य बातम्या

विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर उतरणार ः रविकांत तुपकर

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. सरसकट कर्जमाफी न मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. विकलेल्या शेतीमालाचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांना अडचणी आहेत. या सर्व मुद्यांवर एकत्रित लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या काळात रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. 

जिल्ह्यातील शेगाव येथे रविवारी (ता. २१) कुणबी समाज मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. तुपकर यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या वेळी 'स्वाभिमानी'चे नेते राणा चंदन, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, शेगावचे माजी नगराध्यक्ष गोपाळराव कलोरे, पी. एम. घाटोळे, श्याम अवथळे, अनंता मानकर, रोशन देशमुख, उज्ज्वल पाटील, सय्यद बाहोद्दीन, गोपाल तायडे आदी उपस्थित होते. या वेळी

श्री. तुपकर म्हणाले, की  शेतकरी पीककर्ज, पीकविम्यासाठी दारोदारी फिरत आहे. सरकारने केलेल्या अर्धवट कर्जमाफीमुळे आजही हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यांना आता पीककर्जसुद्धा मिळत नाही. जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन पेरण्या केल्या आहेत. पाऊसही फारसा चांगला नाही. शेगाव तालुक्यात तुरीच्या ऑनलाइन नोंदणीतून १२६० वंचित शेतकऱ्यांना यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले, पण अनुदान मात्र अजून मिळाले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याही अडचणी आहेत. अशा सर्व मुद्यांवर येत्या काळात ‘स्वाभिमानी’ मोठे आंदोलन छेडणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT