Swabhimani agitation in front of MSEDCL office at Krishnanagar
Swabhimani agitation in front of MSEDCL office at Krishnanagar 
मुख्य बातम्या

कृष्णानगर येथे महावितरण कार्यालयासमोर ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

टीम अॅग्रोवन

सातारा : कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महावितरण विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. २४) कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

अन्यायकारक वीजबिल वसुलीच्या विरोधात, खोटी बिले रद्द करण्यासाठी व दहा तास अखंडित वीज मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन कोल्हापुरात सरू आहे. एफआरपीचे दोन तुकडे करणाऱ्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध म्हणून सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलनकर्ते कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला बसण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.  आंदोलनाची धग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कागल येथे महावितरणचे कार्यालय पेटवले

कोल्हापूर : ‘‘दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला कागल येथे हिंसक वळण लागले. धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे अज्ञातांनी कागलचे महावितरण कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला. शाहू कारखान्याच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT