Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

Fund Expenditure : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, पौष्टिक तृणधान्य अभियान, क्रॉपसॅप, कापूस, सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखली विकास आदी योजनांतर्गत ३७ कोटी ३९ लाख ८६ हजार रुपये निधी खर्च झाला आहे,
Agriculture Funds
Agriculture FundsAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, पौष्टिक तृणधान्य अभियान, क्रॉपसॅप, कापूस, सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखली विकास आदी योजनांतर्गत ३७ कोटी ३९ लाख ८६ हजार रुपये निधी खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्राप्त १९ कोटी ७८ लाख ७२ हजार ९५७ रुपये अनुदानातून ७२५ लाभार्थ्यांसाठी ५ कोटी ५० लाख ५९ हजार ७२ रुपये निधी खर्च झाला. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्राप्त १३ कोटी १७ लाख ३५ हजार ४४७ रुपये अनुदानातून १ हजार ३६१ लाभार्थींना ८ कोटी ४८ लाख १६ हजार १८८ रुपये अनुदान देण्यात आले.

Agriculture Funds
Agriculture Funds : लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन,‘कृषि’साठी २ कोटींवर तरतूद

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्राप्त १ कोटी १० लाख ७८ हजार ३९० रुपये निधीतून २३३ लाभार्थ्यांना १ कोटी ३ लाख ३३ हजार ६१० रुपये अनुदान वितरित झाले. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत प्राप्त एकूण १९ कोटी ७८ लाख ७२ हजार ९५७ रुपये निधीतून २ हजार ३१९ लाभार्थांवर १५ कोटी २ लाख ८ हजार ८७० रुपये (७५.९२ टक्के) निधी खर्च झाला.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त १८ लाख १७ हजार ४८० रुपयांपैकी १७ लाख ७४ हजार ९५० रुपये निधी खर्च झाला. कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत प्राप्त ५५ लाख ९ हजार ८९ रुपयांपैकी ५५ लाख ७ हजार ४९१ रुपये खर्च झाले. महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत प्राप्त ५९ लाख २५ हजार १३३ रुपयांपैकी ५९ लाख २४ लाख १५७ रुपये खर्च झाला.

Agriculture Funds
Agriculture Fund : कृषी पायाभूत निधी योजनेत राज्याचा डंका

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त ५ कोटी ४३ लाख १८ हजार रुपयांपैकी ५ कोटी ४३ लाख १४ हजार ७४ रुपये खर्च झाला, तर कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कृती योजनेअंतर्गत प्राप्त सर्व २ कोटी ५७ लाख ५४ हजार रुपये निधी खर्च झाला.

कडधान्यांतर्गत ९८ टक्के निधी खर्च

अन्न व पोषण सुरक्षा कडधान्यांतर्गत ५ कोटी ५२ लाख १४ हजार ९२६ रुपये निधीतून ५ कोटी ४२ लाख ४१ हजार ५०८ रुपयांपैकी ५ कोटी ४२ लाख ४१ हजार ५०८ रुपये (९८.२४ टक्के) खर्च झाला. अन्न व पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत प्राप्त २ कोटी ९५ लाख ३९ हजार २५० रुपयांतून २ कोटी ९३ लाख ९९ हजार ६०९ रुपये व राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत प्राप्त सर्व ४ कोटी २८ लाख ९९ हजार ७८६ रुपये खर्च झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com