ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे परभणीत ठिय्या आंदोलन
ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे परभणीत ठिय्या आंदोलन 
मुख्य बातम्या

ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे परभणीत ठिय्या आंदोलन

टीम अॅग्रोवन

परभणी : गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम तत्काळ देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पिठलं भाकर खात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माखणी (ता. गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गतवर्षी (२०१७) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस नेत असताना प्रतिटन २ हजार २०० रुपये दर देऊ, असे सांगितले होते. सुरवातीला काही शेतकऱ्यांच्या उसाला २ हजार रुपये, तर उर्वरित शेतकऱ्यांना १ हजार ५०० रुपये दर देण्यात आला. शासन निर्णयानुसार १४ दिवसांच्या आत एक रकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. या काराखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी १ हजार १५५ रुपये कपात केली आहे. त्यानुसार ७०० ते ८०० शेतकऱ्यांचे पैसे कारखान्याकडे निघतात. तूर्तास कारखान्याने मागील वर्षी जाहीर केलेल्या बिलातील शिल्लक रक्कम ५०० रुपये याप्रमाणे सोमवार (ता. १०) पर्यंत द्यावी, अन्यथा मंगळवार (ता. ११) पासून अन्यायग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या वेळी ऊस  दर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा नांदेड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिगांबर पवार, दीपक भालेराव, केशव आरमळ, भास्कर खटिंग आदींसह ऊस बिल थकलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT