सुपरमून, ब्ल्यूमून एकत्र पाहण्याचा योग
सुपरमून, ब्ल्यूमून एकत्र पाहण्याचा योग  
मुख्य बातम्या

'सुपरमून, ब्ल्यूमून' एकत्र पाहण्याचा आज 'चंद्र'योग !

वृत्तसेवा

मुंबई : सुपरमून, ब्ल्यूमून आणि खग्रास चंद्रग्रहण एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी आज (ता.३१) आला आहे. आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्थिती साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याला सुपरमून  म्हणतात. मात्र सुपरमून ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४  टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्ल्यू मून  म्हणतात. त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र ब्ल्यू दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ब्ल्यू मून  म्हटले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते रात्री ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत आकाशात पूर्वेकडे साध्या डोळ्यांनी सुपर आणि ब्ल्यू मूनचे दर्शन घेता येईल, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. ३१ मार्च १८६६ नंतर १५२ वर्षांनी हा योग येणार आहे. 

चंद्रग्रहण  बुधवारी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितिजाच्याखाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता असून त्यावेळी चंद्रबिंब आकाशात पूर्वेला बरेच वर आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८  मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून  ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT