राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबिर कर्जत (जि. रायगड)
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबिर कर्जत (जि. रायगड) 
मुख्य बातम्या

तीन वर्षांत शेतकऱ्यांची अवस्था बिकट : सनिल तटकरे

टीम अॅग्रोवन

मुंबई ः सत्तांतर होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (ता. ६) केली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबिर कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित करण्यात आले आहे. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  ते पुढे म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली तर फौजदारी कारवाई केली जाईल असे सरकार म्हणते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. २०१४ पासून भाजपचे सरकार आहे, शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जात आहे. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाविरोधात शिवसेना प्रखर टीका करते. जे निर्णय प्रक्रियेत आहेत तेच मोर्चा काढतात, आंदोलन करतात. ही विसंगती जनतेपर्यंत पोचवली पाहिजे. सोशल मीडियावर सरकारचे सुरवातीला कौतुक होत होते. मात्र, मागील ३ महिन्यांपासून सोशल मीडियावर सरकार विरोधात वातावरण तयार झाले आहे.                                                                      ...तर शरद पवार पंतप्रधान : प्रफुल्ल पटेल देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात वातावरण पेटत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे २०१९ ला शरद पवार पंतप्रधान होतील असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतो आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादीला अटलबिहारी वाजपेयींनी एनडीएमध्ये येण्याचा आग्रह केला होता. तेव्हा अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष एनडीएमध्ये गेले. शरद पवार यांना तेव्हा दोन नंबरचे स्थान मिळाले असते. पण शरद पवार आपली विचारधारा सोडून एनडीए बरोबर गेले नाहीत. मग आता भाजपबाबत संभ्रम का निर्माण केला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही हा संभ्रम आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी ती जागा भरून काढेल, असे बोलले जाते. पण असा निर्णय कुणी घेतला? आपले नेतेही आपसात चर्चा करतात, हे थांबवा. राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT