Summer rains increased in Vidarbha 
मुख्य बातम्या

विदर्भात उन्हाच्या झळा वाढल्या

टीम अॅग्रोवन

पुणे : कमाल तापमान चाळिशी पार पोहोचल्याने विदर्भात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

आज (ता. २५) विदर्भात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाला पोषक हवामान असून, ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात उन्हाच्या झळा वाढतच आहेत. विदर्भासह राज्यात कमाल तापमानासह, ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ होणार आहे. आजपासून (ता. २५) गुजरात राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, (ता. २५) सिंधुदुर्ग, रत्नागिरी  जिल्ह्यांत विजा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, धुळे ३८.६, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर २९.१, नाशिक ३७.२, निफाड ३७.२, सांगली ३६.२, सातारा ३६.४, सोलापूर ३९.५, सांताक्रूझ ३८.२, डहाणू ३४.७, रत्नागिरी ३१.९, औरंगाबाद ३८.५, परभणी ४०, अकोला ४१.६, अमरावती ४१.४, बुलडाणा ४०, ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४१, गोंदिया ३९.२, नागपूर ३९.२, वर्धा ४०.५, यवतमाळ ४०.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT