उन्हाळी पीक लागवडीत १४ टक्क्यांनी वाढ 
उन्हाळी पीक लागवडीत १४ टक्क्यांनी वाढ  
मुख्य बातम्या

उन्हाळी पीक लागवडीत १४ टक्क्यांनी वाढ 

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली: लॉकडाऊनमधून शेतीकामांना सुट मिळाल्याने रब्बी पिकांची काढणी आणि उन्हाळी पिकांची लागवड करणे शतकऱ्यांना शक्य झाले. मात्र, यंदा उन्हाळी पिकांच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टकक्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत ५२.७८ लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात ३८.६४ लाख हेक्टरवर लागवड होती.  देशात यंदा मॉन्सूनच्या काळात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व व्यवहार आणि कामे ठप्प झाली होती. परंतु केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतीकामांना लॉकडाऊनमधून सुट दिल्याने रब्बी पिकांची काढणी करणे शक्य झाले. रब्बीचे क्षेत्र रिकामे झाल्याने उन्हाळी पिकांची लागवड झाली.  देशात रब्बीत १६१ लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली होती. हरभरा, तूर, उरद, मूग आणि वाटाणा पिकांची काढणी पुर्ण केली आहे. उसाची ५४.२९ लाख हेक्टरवर लागवड होती. त्यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये उसाची काढणी पुर्ण झाली आहे. रब्बीत भाताची २८ लाख हेक्टरवर लागवड होती. त्यापैकी आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्‍चिम बंगालमध्ये भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तेलबिया पिकांचीही काढणी अनेक राज्यांमध्ये पुर्ण झाली आहे. 

गहू काढणीला वेग  देशात रब्बी हंगामात ३१० लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती. त्यापैकी ६३ ते ६७ टक्के पिकांची काढणी झाली आहे. मध्य प्रदेशात ९० ते ९५ टक्के, राजस्थान ८० ते ८५ टक्के, उत्तर प्रदेश ६० ते ६५ टक्के, हरियानात ३० ते ३५ टक्के आणि पंजाबमध्ये १० ते १५ टक्के पिकाची काढणी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT