Sumit Kumar, Deputy Director, Mahavitaran suspended
Sumit Kumar, Deputy Director, Mahavitaran suspended 
मुख्य बातम्या

‘महावितरण’चे उपसंचालक सुमितकुमार निलंबित

टीम अॅग्रोवन

मुंबई : ‘महावितरण’च्या मीटर रीडिंग एजन्सी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले. या प्रकरणी सुरक्षा व अंमलबजावणी उपसंचालक सुमितकुमार यांना निलंबित करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी (ता.२४) विधानसभेत केली. सुमितकुमार यांनी केलेल्या विदेश दौऱ्यांची आणि अन्य प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही राऊत यांनी दिली. 

कल्याण परिमंडळात कार्यरत असताना सुमितकुमार यांच्याविरोधात महिलांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी केली जाईल. विशाखा समितीचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही राऊत यांनी सांगितले. 

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सुमितकुमार हे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेतून सरळसेवा भरतीद्वारे २००८ मध्ये महावितरणमध्ये रुजू झाले. त्यांच्याकडे वीज चोरी रोखणे आणि अन्य सुरक्षाविषयक जबाबदाऱ्या असलेले सुरक्षा व अंमलबजावणी उपसंचालक पद देण्यात आले होते. कोकण परिक्षेत्रांतर्गत कल्याण येथे असताना त्यांच्याविरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांची बदली वाशीम येथे करण्यात आली. सध्या ते कोकण प्रादेशिक कार्यालयात कार्यरत  आहेत. 

सुमितकुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून पद मिळविल्याचा आरोप होता. त्यांनी लाच मागितल्याच्या ऑडिओ क्लिप तत्कालीन अध्यक्षांकडे दिल्या होत्या. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. याबाबत चौगुले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी भाग घेत सुमितकुमार यांच्या कामाचा पाढा वाचला. 

महिलांच्या तक्रारींचीही होणार चौकशी 

अनेक महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समितीकडे सुमितकुमार यांच्याविरोधात नैतिक अधःपतनाच्या तक्रारी केल्या आहेत. सुमित कुमार यांच्या विरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी त्यांना निलंबित करण्यात येत आहे. तसेच तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून वस्तुस्थितिदर्शक अहवाल शासनास पाठविण्याबाबत ‘महावितरण’ला सूचना दिल्या आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांकडून  पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर छाननीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT