सुहास दिवसे
सुहास दिवसे  
मुख्य बातम्या

आपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः सुहास दिवसे

टीम अॅग्रोवन

पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती, तरीही राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत पेरणी करावयाची असल्यास कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे मिश्र पिके घेण्यात यावीत, असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.  आपत्कालीन पीक नियोजनाबाबत कृषी आयुक्त दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालयात सोमवारी (ता. २२) बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आयसीएआर वरिष्ठ शास्त्रज्ञ के. व्ही. राव, डॉ. के. गोपीनाथ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. जाधव, डॉ. आसेवार, कृषी संचालक विजय घावटे, प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक, अनिल बनसोडे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदि उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्याचे पाऊसमान व पीक परिस्थितीबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार पुढील काळात पेरणी करण्याबाबत पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे. श्री. दिवसे म्हणाले की, की येत्या दोन ते चार दिवसांत हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. तरीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांनी संकरीत  बाजरी, सूर्यफुल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत.   तसेच एक ते १५ ऑगस्ट या दरम्यान एरंडी, तीळ, संकरीत बाजरी, रागी, सूर्यफुल, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तर १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सूर्यफुल, तूर व एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तसेच यापुढील कालावधीत कापूस, ज्वारी, भुईमूग या पिकाची पेरणी करू नये. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. पण पावसाने ओढ दिली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोळपणी करावी. तसेच पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT