ऊस दर आंदोलन
ऊस दर आंदोलन 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटू लागले

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील कारखान्यांचे धुराडे पेटवू न देण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. वाळवा, मिरज, या तालुक्‍यांतील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीच गनिमीकाव्याने आंदोलनाची सुरवात केली आहे. ऊसदराचे आंदोलन आता पेटू लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने चालू करणार नसल्याचे बैठकीत ठरले. मात्र, कोल्हापूरच्या बैठकीला सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आले नसल्याचे समजते आहे. त्यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. या चर्चेत काय झाले अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांची भूमिका काय असणार, असा प्रश्‍न समोर आला आहे. असे असताना साखर कारखानदारांनी पहिली उचल जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यातच गेल्या हंगामातील एफआरपी अधिक २०० रुपये दराचा प्रश्‍नही भिजत पडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे कार्यकर्ते ऊस फडात जाऊन ऊसतोडी रोखू लागले आहेत.  दरम्यान, वाळवा, कडेगाव तालुक्‍यांतील साखर कारखाने सुरू झाले. उसाच्या फडात ऊसतोडणी सुरू झाली. वाहतूक सुरू झाली. अन्‌ शेतकरी संघटना आक्रमक झाली. शेतकरी संघटनेने ऊसतोडणी थांबवली. वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर अडवून टायर फोडण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गनिमीकाव्याने आंदोलन करत आहेत. रात्री सुरू असणारी वाहतूक अडवून ट्रॅक्‍टरच्या चाकातील हवा सोडण्यात येत आहे.  मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागात कर्नाटकातील कारखाने ऊस नेण्यासाठी आले आहेत. मात्र, गेल्या हंगामातील पैसे अद्यापही या कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटकातील साखर कारखान्यांना ऊस गाळपास दिला जाणार नाही यावर ठाम आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT