देशात ऊस लागवडीत किंचित घट
देशात ऊस लागवडीत किंचित घट 
मुख्य बातम्या

देशात ऊस लागवडीत किंचित घट

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होईल, असा अंदाज होता. मात्र २०१८-१९ मधील हंगामच्या तुलनेत यंदा केवळ पाच हजार हेक्टरची घट झाली आहे. गेल्या हंगामात ४७ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र उसाखाली होते. यंदा जवळपास ४७ लाख ८५ हजार हेक्टरवर ऊस आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली.  दुष्काळी स्थितीमुळे देशात ऊस लागवड घटली असली, तरीही की महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये लागवड वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उसाखालील क्षेत्र वाढले आहे. उत्तर प्रदेशात यंदा विक्रमी २४ लाख हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात लागवडीत १५.७ टक्के घट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात उच्चांकी लागवड उसाखालील क्षेत्राचा विचार करता उत्तर प्रदेश मागील तीन वर्षांपासून आघाडीवर आहे. येथे आतापर्यंतची उच्चांकी ऊस लागवड २१ लाख ८० हजार हेक्टरवर झाली आहे. तर मागील हंगामात २१ लाख २० हजार हेक्टरवर लागवड होती. यंदा उत्तर प्रदेशात विक्रमी २४ लाख हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे.   महाराष्ट्रात ऊस लागवडीत १५.७ टक्के घट महाराष्ट्रातील ऊस उत्पादक पट्ट्यात मागील मॉन्सून हंगामात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाईमुळे ऊस लागवड प्रभावित होऊन मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १५.७ टक्के लागवड घटली आहे. राज्यात खरीप हंगामापर्यंत आठ लाख ६० हजार हेक्टरवर ऊस लागवड होते. मात्र, गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये विक्रमी ११ लाख ६० हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. परंतु, यंदा लागवडीत १५.७ टक्के घट होऊन उसाखालील क्षेत्र आठ लाखांवर येण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT