सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीत वाढ
सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीत वाढ  
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीत वाढ

टीम अॅग्रोवन

सांगली ः गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात घट होणार अशी शक्‍यता साखर कारखान्यांनी व्यक्त केली होती, मात्र जिल्ह्यात ९८ हजार ७९० हेक्‍टरवर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षी ९५ हजार ८२७ हेक्‍टरक्षेत्रावर ऊस होता. म्हणजेच २ हजार ३६३ हेक्‍टरने ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, आडसाली ऊसाच्या क्षेत्रात घट आहे.  जिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा, यासह दुष्काळी पट्ट्‌यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात देखील उपसा सिंचन योजनचे पाणी पोहोचल्याने या भागात सुध्दा ऊस लागवडीचे प्रमाण काही अंशी वाढलेले पहावयास मिळते आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाचा आढावा पाहिला तर दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरने उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्यावर्षी ९५ हजार हेक्‍टरवर ऊसाचे क्षेत्र होते. त्यामुळे गाळपाची स्पर्धा अटळ होती. परंतु, कृष्णा आणि वारणा नदीला ऑगस्ट महिन्यात महापूर आला, त्यामुळे साखर कारखाने उशीरा सुरु झाले. त्याच दरम्यान, वाळवा, मिरज, आणि पलूससह कडेगाव तालुक्‍यात जूलै ऑगस्ट मध्ये आडसाली उसाची लागवड होते. परंतू आडसाली ऊसाची लागवड झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्व, सुरु हंगामात लागवड कऱण्यास प्राधान्य दिले. तसेच खोडवा क्षेत्रात देखील वाढ झाली.  आडसाली उसाच्या क्षेत्रात घट  ऊस पट्ट्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यात ऊस लागवड प्रामुख्याने केली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी लागवडीसाठी शेती तयार करुन ठेवली होती. परंतू या दरम्यान, महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. परिमाणी शेतात साचलेले पाणी कमी होण्यासाठी महिन्याचा काळ गेला. त्यामुळे आडसाली उसाची लागवड करण्याचे नियोजन कोलमडल्याने आडसाली क्षेत्रात घट आली.  हंगामनिहाय ऊस लागवड (हेक्‍टरमध्ये) 

हंगाम लागवड
आडसाली ३०,८१० 
पूर्व हंगामी २१,९७२
सुरु १२,३८१ 
खोडवा ३३,६२३ 
एकूण ९८,७९० 

वर्षनिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये) 

वर्ष लागवड 
२०१७-१८ ८०,४४९ 
२०१८-१९ ८९,९१८ 
२०१९-२० ९५,८२७ 
२०२०-२१ ९८,७९० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT