Sugarcane in Nanded division 94 lakh tonnes of threshing
Sugarcane in Nanded division 94 lakh tonnes of threshing 
मुख्य बातम्या

नांदेड विभागात उसाचे ९४ लाख टनाचे गाळप

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम आटोपला आहे. २६ साखर कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप केले. तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १८ खासगी, तर आठ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगरपासून हंगाम सुरु झाला. तर शेवट बळिराजा साखर कारखान्याचा पट्टा पडून झाला. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती मिळाली. 

गाळप, उताऱ्यात बळिराजा अव्वल नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळिराजा, कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने हंगामाअखेर सहा लाख ७९ हजार २४६ टन उसाचे गाळप करून सात लाख ७२ हजार ५०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर या कारखान्याचा साखर उतारा ११.३७ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधिक आहे. या सोबतच गंगाखेड शुगर कारखान्याने चार महिन्यांत सहा लाख २८ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन सहा लाख ४८ हजार ९०० क्विंटल केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

Kharif Season 2024 : ‘वनामकृवि’च्या खरीप बियाणे विक्रीचा शनिवारी प्रारंभ

Turmeric Cultivation : हळदीची लागवड वाढणार

Straight Cotton Variety : सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

SCROLL FOR NEXT