ऊस गाळप हंगाम २०१७-१८
ऊस गाळप हंगाम २०१७-१८ 
मुख्य बातम्या

दक्षिण महाराष्ट्रात उसाला २९०० रुपयांपर्यत एफआरपी ?

Raj Chougule

कोल्हापूर : मुंबईत आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत यंदा केंद्राच्या निर्णयानुसार राज्यात ही ऊस दराचा फॉर्म्युला राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दक्षिण महाराष्ट्रतील (कोल्हापूर, सांगली) साखर कारखान्याचा यंदाचा एफआरपी  (तोडणी वाहतूक खर्च वजा जाता) किमान २४५० ते जास्तीत २९०० रुपये इतका मिळणार आहे.

कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्याची रिकव्हरी १२ ते १२.५० पर्यन्त जाते. ही बाब लक्षात घेता यंदा साखर कारखाने 2900 रुपये पर्यन्त एफआरपी देऊ शकतात अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. 

प्रत्येक कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्च कमी जास्त असल्याने प्रत्येकाचा दर थोडा कमी जास्त होऊ शकतो. 

या भागातील दर हा राज्यात सर्वाधिक असल्याने राज्यातील इतर भागातील कारखान्यानचा दर या पेक्षाही कमी असेल असे तज्ज्ञांनी सांगितले. 

केंद्र शासनाने २०१७-१८ या गाळप हंगामासाठी ९.५० टक्के उताऱ्यासाठी 2550 रुपये प्रति मेट्रिक टन(वाहतूक खर्चासह) ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला पुढील प्रत्येक एक टक्के उताऱ्यासाठी २६८ रुपये प्रति मेट्रिक टन देणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT