sugar factory
sugar factory  
मुख्य बातम्या

महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर कारखान्यांचा पट्टा

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांचाही अजून महिनाभरात पट्टा पडणार असल्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून व्यक्त करण्यात आला. आतापर्यंत सुमारे २७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून साधारण पंचवीस लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चाळीस टक्केच गाळप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  नगरसह राज्याच्या अनेक भागांत मुख्य आर्थिक आधार म्हणून साखर कारखानदारीकडे पाहिले जाते. एकेकाळी जिल्ह्यात साखरेचा गाळप हंगाम सहा ते सात महिने चालायचा. मात्र, दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र पन्नास हजार हेक्‍टरने घटले आहे. नाशिक विभागामध्ये यंदा आतापर्यंत १५ साखर कारखान्यांनी सुमारे २७ लाख ३० हजार ८०९ टन गाळप केले असून २५ लाख ६७ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये ऊस टंचाईचा मोठा फटका बसला असून विभागातील तब्बल सतरा कारखाने बंद आहेत. गाळप आणि साखर उत्पादनात खासगी कारखान्यांचाच बोलबाला आहे. यंदा नगर जिल्ह्यात तेवीसपैकी केवळ १३ साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. केदारेश्‍वर कारखाना उसाअभावी मध्येच बंद करावा लागला. सुरू असलेल्या कारखान्यांपैकी ९ कारखान्यांचा हंगाम १५ फेबुवारीपर्यंत बंद होईल तर अगस्ती, विखे पाटील, संगमनेर व अशोक हे कारखाने साधारण मार्चच्या सुरवातीपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. उसाचा गाळप हंगाम साधारण पाच ते सहा महिने चालत असतो. यंदा केवळ आडीच महिने चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी १ कोटी ३४ लाख टन गाळप झाले होते. यंदा ५५ लाख टनाच्या जवळपास म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के गाळप होईल, असा अंदाज आहे.  ‘अंबालिका’चा वरचष्मा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जत तालुक्‍यातील अंबालिका साखर कारखाना साखरेच्या उत्पादनात अव्वल राहिला. दुसऱ्या स्थानावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आहे. मागील वर्षीही ‘अंबालिका’ने आघाडी घेतली होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT