रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील 
मुख्य बातम्या

यंदा उसाला चार हजार रुपयांच्या खाली रुपया घेणार नाही : रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारची जुलमी धोरणेही त्यात भर घालत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. कर्जे असो की वीजबिल; शेतकरी भरणार नाहीत, तसेच यंदा उसाला प्रतिटन चार हजार रुपयांच्या खाली एक रुपयाही घेणार नाही, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर येथे मंगळवारी (ता.३) शेतकरी संघटनेची शेतकरी परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, अशोक पठारे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सारवडे, वंदना माळी, महादेव कोरे, अॅड. अजित काळे आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की पुरासारखे भयाण संकट सांगली, कोल्हापूरवर आले. आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ व महापुराचा समावेश करून जिरायती शेतीला एकरी पन्नास हजार रुपये व बागायती शेतीला एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. गेल्या सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्याकडे पाहायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, आज सरसकट कर्जमाफीची गरज आहे, असेही ते म्हणाले.    `विधानसभेच्या  सर्व जागा लढवणार` शेतकरी परिषदेच्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, की सध्याची राजकीय परिस्थिती खूपच वेगळी आहे. कोण कुठे चालले आहे आणि कशासाठी चालले आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, आम्हांला त्याच्याशी देणेघेणे नाही, चांगली माणसे निवडून यावीत, अशी अपेक्षा आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना सर्व २८८ जागा लढवणार आहे.   शेतकरी परिषदेतील मागण्या

  • शेतकरी कायदे रद्द करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेची पुनर्स्थापना करावी.
  • शेतकऱ्यांना कर्जातून सरसकट आणि वीजबिलातून मुक्त करावे.
  • शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी.
  • आगामी गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन ४००० रुपये दर मिळावा.
  • गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

    Rural Story : जागरण

    Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

    SCROLL FOR NEXT