साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी 
मुख्य बातम्या

साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी किमान दोन हजार कोटींचे तातडीचे पॅकेज मिळावे, अशी मागणी साखर संघाने राज्य शासनाने केली आहे. जागतिक बाजारपेठेत भावात घसरण झालेली असताना देशात अतिरिक्त साखर साठा भरपूर आहे. त्यामुळेच देशांतर्गत बाजारपेठेतील साखर दरात सुधारणा झालेली नाही. महाराष्ट्रात चालू गाळपात साखर पोत्यामागे ४०० रुपये तोटा होतो आहे, अशी भूमिका साखर संघाने राज्य शासनासमोर मांडली आहे.   कारखान्यांचे कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि त्यातून एफआरपी अदा न करण्याच्या अवस्थेत आलेले कारखाने यांमुळे पॅकेजची आवश्यकता आहे, असे संघाचे म्हणणे आहे. 

केंद्र शासनाकडून साखर उद्योगाला सवलती जाहीर झालेल्या असल्या तरी त्याचे लाभ दीर्घकालीन स्वरूपाचे आहेत. मात्र, सध्या तयार झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पॅकेज दिल्यास साखर कारखान्यांना निर्यातीची कच्ची साखर बंदरापर्यंत नेण्यासाठी उपयोग होईल. निर्यात झालेल्या साखरेवर अनुदान मिळाल्यास उत्पादन खर्चातील तोट्यात मदत होईल, असे संघाचे म्हणणे आहे. 

साखर निर्यातीसाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना १५ लाख ३८ हजार टनाचा कोटा मिळाला आहे. त्यात केंद्राकडून वाहतूक अनुदान तसेच निर्यात प्रोत्साहन अनुदान मिळाले तरी ते पुरेसे नाही. निर्यात करून देखील कारखान्यांना तोटाच होणार असल्याने राज्य शासनाने निर्यात अनुदान दिल्यास तोटा नियंत्रित राहील. अर्थात निर्यातीसाठी दोन्ही पातळ्यांवर अनुदान देताना काराखान्यांना सॉफ्ट लोनदेखील द्यावे लागेल. किमान दोन हजार कोटी रुपये मिळाले तरच साखर उद्योग सावरू शकतो, असेही संघाचे म्हणणे आहे.  लवकरच बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून साखर कारखान्यांच्या सध्याच्या समस्यांबाबत लवकरच बैठक बोलविली जाणार आहे. त्यापूर्वीच साखर संघ तसेच खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विस्माकडून विविध मागण्या राज्य शासनाकडे पुन्हा पाठविल्या जाणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT