राज्य बॅंकेने ९० टक्के उचल द्यावी
राज्य बॅंकेने ९० टक्के उचल द्यावी 
मुख्य बातम्या

राज्य बॅंकेने ९० टक्के उचल द्यावी : साखर कारखाने

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या दरामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. यातच राज्य बॅंकेनेही साखरेचे घसरलेले दर गृहीत धरून मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी बॅंकेकडून मिळणाऱ्या उचलीतही घट झाली. बॅंकेकडून उचल कमी मिळाल्याने एफआरपीची रक्कम देताना उर्वरित रक्कम कुठून आणायची याची चिंता कारखानदारांना लागली आहे. राज्य बॅंकेकडून सध्या एका पोत्यावर ८५ टक्के उचल मिळते. ती ९० टक्के मिळावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. जर उचलीच्या प्रमाणात वाढ झाली नाही, तर पंधरा दिवसांनी निघणारे बिल महिन्याने देण्याचा विचार काही कारखाने करत असल्याने आता या दर घसरणीच्या खेळात उत्पादकच भरडला जाण्याची शक्‍यता आहे. रकमेची जुळणीच होत नसेल, तर पंधरा दिवसांनी पहिला हप्ता देणार कसा? असा प्रश्‍न कारखानदारांचा आहे.  साखरेच्या किमती गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे रुपयांनी घसरल्या. हंगामाच्या प्रारंभी ३५०० रुपये असणारी साखर आता ३१०० वर येऊन ठेपली आहे. राज्य बॅंकेने जलदगतीने हालचाली करत मूल्यांकन कमी केले. यामुळे सध्या साखर कारखान्यांना पोत्याला इतर खर्च वजा जाता १८५० रुपये मिळत आहे. कारखान्यांनी ३००० च्या आसपास पहिला हप्ता जाहीर केला आहे. यामुळे कारखान्यांना टनामागे अकराशे ते बाराशे रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. इतर उत्पादनांतून मिळणारे उत्पन्न गृहीत धरूनही या रकमेची जुळवाजुळव करणे अशक्‍य होत असल्याचे कारखानदारांचे म्हणने आहे. सध्या १८५० रुपये कर्जरूपी उचल मिळते. यात बॅंकेने पाच टक्क्‍यांनी वाढ केल्यास २१०० रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकेल, असा अंदाज आहे. बॅंकेने काही तरी उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी कारखानदारांची आहे.  राज्य बॅंक ऐकणार का? सध्या राज्य बॅंकेवर प्रशासक मंडळ आहे. ज्या वेळी साखरेचे दर वाढत असतात, त्या वेळी महिन्याचा स्थिर दर लक्षात ठेवून बॅंक मूल्यांकन करते; पण ज्या वेळी दर घसरतात, त्या वेळी मात्र बॅंक तातडीने निचांकी दर गृहीत धरून साखरेचे मूल्य ठरविते. कारखानदारांनी जरी ९० टक्क्यांची मागणी केली तरी राज्य बॅंकेचे व्यवस्थापन उचल वाढवून देईल का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.  पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांच्या गाळप क्षमतांचा विचार केल्यास एका कारखान्याचे पंधरवड्याचे बिल २० ते २२ कोटी रुपये इतके होते. प्राप्त परिस्थितीत इतकी रक्कम जमा करणे केवळ अशक्‍य बनत आहे. यामुळे पहिला हप्ता पंधरा दिवसांनी देण्याऐवजी थोडा उशिरा देण्याविषयी ही काही कारखाने विचार करत आहेत.  - अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT