rajendra shingne
rajendra shingne 
मुख्य बातम्या

राज्यात औषधाचा मुबलक साठा 

टीम अॅग्रोवन

नगरः कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसले, तरी त्यासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने अजिबात काळजी करण्याची गरज नाही. राज्यातील रेड झोन वगळता इतर जिल्ह्यांत लवकरच उद्योगधंदे सुरू करण्यात येणार आहेत, असा विश्‍वास अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी (ता.१८) व्यक्त केला. 

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि कोरोनावर मात करण्यासाठी दोन महिने तरी विशिष्ट औषध उपलब्ध होणार नाही. सुरवातीच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा होता. त्यानंतर सरकारने तातडीने राज्यातील 288 कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तरी सॅनिटायझरचा तुटवडा येणार नाही. फूडच्या बाबतीत बहुतांश कंपन्यांचे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर आहे. त्यामुळे मजूर उपस्थिती कमी असून, उत्पादनही कमी होत आहे. मात्र, आता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी काळात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा भासणार नाही.  अन्यथा कारवाई  लॉकडाउनच्या काळात अनेकांनी मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने आळा घालण्यात आला. यापुढे चढ्या भावाने किंवा मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT