Successful launch of foreign satellites from ISRO 
मुख्य बातम्या

‘इस्रो’ची अवकाशात तेजोमय भरारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (ता. ७) पुन्हा एकदा अवकाशात यशस्वी झेप घेतली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून रडार इमेजिंग उपग्रह ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट’ (ईओएस-०१) सह अन्य नऊ परकीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (ता. ७) पुन्हा एकदा अवकाशात यशस्वी झेप घेतली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून रडार इमेजिंग उपग्रह ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट’ (ईओएस-०१) सह अन्य नऊ परकीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून ही उपग्रहे अवकाशात सोडण्यात आली. या प्रक्षेपणाला निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षातील इस्रोची ही पहिलीच भरारी असल्याचे बोलले जाते. या यशानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवान म्हणाले की, ‘‘दिवाळीच्या आधीच तुम्ही रॉकेट सोडले आहे. आता खरा उत्सव सुरू होईल. अंतराळाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्हाला वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून करता येत नाही. एखाद्या मोहिमेसाठी अभियंते, संशोधक यांना येथे हजर राहावेच लागते.’’

सायंकाळी ३.१२च्या सुमारास या उपग्रहांना घेऊन प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतली त्यानंतर अलगदपणे उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडले. इस्रोने या आधी जानेवारी महिन्यामध्येच ‘जीसॅट-३०’ दूरसंचार क्षेत्रातील उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते पण हे प्रक्षेपण फ्रान्समधील गुयाना येथून करण्यात आले होते. या यशस्वी भरारीनंतर आता इस्रोकडून अवकाशात पाठविण्यात आलेल्या परकीय उपग्रहांची संख्या ३२८ वर गेली आहे.

‘ईओएस०१’ ची वैशिष्ट्ये हा रडार इमेजिंग उपग्रह आहे. सिंथेटिक अपार्चर रडार ढगांच्या पल्याड देखील पाहू शकतो. दिवस रात्र प्रत्येक ऋतूमध्ये त्याला फोटो काढता येणे शक्य होणार आहे. देशाच्या सीमांवर देखील या माध्यमातून नजर ठेवता येईल. शेती, वने, मातीमधील आर्द्रता यांचा शोध घेण्यासाठी देखील या उपग्रहाचा वापर होईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील या उपग्रहाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crops: यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असह्य?

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

SCROLL FOR NEXT