नांदेड जिल्ह्यात फळपिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करा
नांदेड जिल्ह्यात फळपिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करा 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात फळपिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करा

टीम अॅग्रोवन

नांदेड : राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत पीकविमा योजना २०१९-२० मध्ये आंबिया बहाराकरिता लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील केळी, मोसंबी, आंबा या फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार शेतकऱ्यांना केळी फळ पिकाचा विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी गुरुवार (ता. ७) पर्यंतची, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना शुक्रवार (ता. १५) पर्यंतची अंतिम मुदत आहे.

भारतीय कृषी पीकविमा कंपनीतर्फे ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोसंबी, केळी, आंबा तसेच द्राक्ष या ४ फळपिकांसाठी ही योजना आहे. गारपीट आणि हवामान धोक्यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी केळी, मोसंबी, द्राक्ष फळासाठी गुरुवार (ता. ७), तर आंबा पिकासाठी मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी केळी, मोसंबी, द्राक्षासाठी शुक्रवार (ता. १५) आणि आंबा पिकासाठी मंगळवार (ता. ३१) डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत राहील. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी, बँकेशी, संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधा, असे करण्यात आले.

ही योजना अधिसूचित फळपिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळांना लागू राहील. अधिसूचित फळपीक तालुकानिहाय, अधिसूचित महसूल मंडळे पुढीलप्रमाणे : मोसंबी ः नांदेड तालुका ः  लिंबगाव, विष्णुपुरी, मुदखेड तालुका ः बारड, अर्धापूर तालुका ः मालेगाव (एकूण मंडळे ः ४) केळी ः  नांदेड तालुका ः तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी, अर्धापूर तालुका ः  अर्धापूर, दाभड, मालेगाव, मुदखेड तालुका ः मुदखेड, मुगट, बारड, हदगाव तालुका ः हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी, लोहा तालुका ः शेवडी बा., भोकर तालुका ः भोकर, देगलूर तालुका ः  मरखेल, हाणेगाव, किनवट तालुका ः किनवट, बोधडी (एकूण मंडळे २१) आंबा ः अर्धापूर तालुका ः मालेगाव, दाभड, मुखेड ः मुक्रमाबाद (एकूण ३ मंडळे).

फळपीकनिहाय विमा स्थिती

फळपीक रक्कम नियमित   विमा हप्ता रक्कम गारपीट विमा हप्ता
मोसंबी ७७०००  ३८५०  २५६६७ १२८३
केळी १३२०००  ६२०० ४४०००  २२००
आंबा १२१०० ६०५०  ४०३३३  २०१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT