लातूर खरेदी केंद्रावरील अडवणुकीचा प्रकार सहकारमंत्र्यांनीच अनुभवला
लातूर खरेदी केंद्रावरील अडवणुकीचा प्रकार सहकारमंत्र्यांनीच अनुभवला 
मुख्य बातम्या

'रिझेक्ट` सोयाबीन झाले `सिलेक्ट`! मंत्र्यांकडून झाडाझडती !! (Video)

हरी तुगांवकर

लातूर : शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱयांची कशी अडवणूक केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला. ग्रेडरने `ऱिझेक्ट` केलेल्या सोयाबीनची थप्पी केंद्रात लावण्यात आली होती. त्यातील माल श्री. देशमुख यांनी काढून पुन्हा मशीनवर मोजायला लावला. तर त्यात हे सोयाबीन `सलेक्ट `झाले. संबधीत कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शासकीय अधिकाऱयांमुळेच शासनाच्या योजना फेल ठऱत असल्याची टिप्पणी श्री. देशमुख यांनी या दौऱयात केली. सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी येथे शासकीय खरेदी केंद्र व शेतमाल तारण योजनेचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी सोयाबीन खरेदी केंद्रावर कशा पद्धतीने अडवणूक सुरु आहे याचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. औशाच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल लातूरच्या गोदामात आणून टाकला जात आहे. तेथील गोदाम रिकामेच ठेवले जात आहे असे श्री. सोमवंशी यांनी वेळी निदर्शनास आणून दिले. श्री. देशमुख यांनी तातडीने वखार महामंडळाच्या वरिष्ठांना मोबाईलवर बोलून तेथील गोदाम उपलब्ध करून दिले. वाहतूकदारांना जगवण्याचे हे षडयंत्र आहे. मुंबईत बसून आम्हाला हे कळत नाही. त्यामुळे आता लातूर ते नागपूरला जाताना सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देवून पाहणी करीत आहे, असे श्री. देशमुख या वेळी म्हणाले. लातूर खरेदी केंद्रावरील अडवणुकीचा प्रकार सहकारमंत्र्यांनीच अनुभवला अधिकाऱयांकडून सर्व काही अलबेल आहे असे सांगितले जात आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी उद्रेक दिसत आहे. अधिकाऱय़ामुळेच शासनाच्या योजना फेल ठरत आहेत. नाफेड व वखार महामंडळ यांच्यात काहीच समन्वय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जावून अडचणी समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर तातडीने त्या दाखवून द्याव्यात असे श्री. देशमुख म्हणाले. यावेळी श्री. देशमुख यांनी सोयाबीन खरेदी केंद्राला भेट दिली. तेथे रिझेक्ट केलेले सोयाबीन ठेवले होते. त्याची तपासणी पुन्हा करायला लावली. यात ते सलेक्ट झाले. यात संबंधीतावर कारवाई करण्याचे आदेश श्री. देशमुख यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT