सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सत्कार
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सत्कार 
मुख्य बातम्या

यशवंत साखर कारखाना सरकार मॉडेल म्हणून चालवणार : सहकारमंत्री

टीम अॅग्रोवन

पुणे : थेऊर (जि. पुणे) येथील बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना मॉडेल म्हणून सरकारच्या वतीने चालवता येईल का, असे प्रयत्न सुरू अाहेत. येत्या हंगामापासून कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लक्ष घातले आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पुणे बाजार समितीचे विभाजन करून पुणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची कागदाेपत्री नव्याने स्थापन करण्यात आल्याच्या निमित्ताने साेमवारी (ता. २) हवेली तालुका भाजपाच्या वतीने मंत्री देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, खडवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष राेहिदास उंद्रे, पुणे बाजार समितीचे माजी संचालक भूषण तुपे,  मंगेश माेडक, संताेष खांदवे, गाेरख दगडे, राजेंद्र काेरपे उपस्थित हाेते.

मंत्री देशमुख म्हणाले, की बंद पडलेल्या यशवंत कारखान्याच्या जमिनींमध्ये माेठ्या शक्तींना विशेष रस असल्याने ती शक्ती कारखाना सुरू हाेऊन देत नाही. जमिनींच्या लिलावासाठी आलेला व्यक्ती परत कसा जाईल, असे काम या ठिकाणी सुरू आहे. यामुळे वारंवार लिलावाची जाहिरात देऊनसुद्धा लिलाव हाेऊ शकेला नाही. यासाठी मॉडेल म्हणून सरकारकडून कारखाना चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. येत्या हंगामात सरकारच कारखाना सुरू करेल.या वेळी तालुकाध्यक्ष राेहिदास उंद्रे यांच्या हस्ते मंत्री देशमुख यांचा संत तुकाराम महाराज यांची पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारावर लाखाेंचा खर्च मंत्री देशमुख यांचा सत्काराला विराेध असतानादेखील आमदार आणि कार्यकर्त्यांना चमकण्यासाठी सत्काराचा घाट घातला गेला हाेता. यासाठी लाखाे रुपयांचा खर्च करण्यात आला असून सभागृहाचे भाडे, फटाक्यांची आतषबाजी, फुलांचे महागडे गुच्छ, विविध पगड्या, स्मृतिचिन्हे, छायाचित्रणाबराेबर उंची केटरर्सला आॅर्डर देऊन जेवणावळदेखील ठेवण्यात आली हाेती.

यासाठी किमान पाच लाखांचा खर्च झाल्याची चर्चा हाेती. हाच कार्यक्रम पणन मंडळाच्या पंचतारांकित इमारतीमधील वातानुकूलित सभागृहात अथवा बाजार समितीच्या सभागृहातदेखील घेता आला असता. मात्र एवढा खर्च करण्याची गरज हाेती का? असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT