संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे रखडली

टीम अॅग्रोवन

सांगली  : अमरापूर, चिखली भागात टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे रखडली आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोटकालव्यांची ही रखडलेली कामे सुरू करण्याची शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील त्याकडे अधिकारी  दुर्लक्ष करीत आहेत. टेंभू योजनेच्या पोटकालव्यांवर शेकडो एकर उसाचे क्षेत्र अवलंबून आहे. परंतु, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.   

अमरापूर, चिखली भागात मोठ्या प्रमाणावर पोटकालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच केलेली कामे निकृष्ट असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यांचे बांधकाम ढासळले आहे. त्यामुळे पाणी सुरू असते त्या वेळी नियोजनाअभावी पाणी रानोमाळ जात असते. जमिनी वर व पोटकालवे खोलात अशी रचना झाल्याने शेतीला पाणी देणेही अवघड होऊन बसले आहे.

बहुतांश ठिकाणच्या पोटकालव्याच्या दरवाज्यांना दारे नसल्याने काही शेतकऱ्यांनी दगड, मुरूम टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला  आहे. त्यामुळे पोटकालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा थर साचला आहे. या पोटकालव्यांची कामे गेल्या काही वर्षभरापूर्वी झाली आहेत. अधिकाऱ्यांनी पाहणी करूनदेखील या पोटकालव्यांच्या दुरुस्ती कामास सुरवात झालेली नाही.

लाभार्थी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम मात्र विनासंमती कपात करून घेतली जाते. त्यामुळे या पोटकालव्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

पोटकालव्यांचे दरवाजे चोरीला या भागात असणाऱ्या बहुसंख्य पोटकालव्यांचे दरवाजे चोरीला गेले आहेत. पोटकालव्यांतून शेतात पाणी नेण्यासाठी शेतकरी दगड, विटा, मुरूम टाकून पाणी अडवित असल्याने अनेक ठिकाणी पोटकालव्यात दगड, विटांचा ढीग लागला आहे. अनेक ठिकाणी पोटकालव्याभोवती झाडेझुडपे उगवल्यामुळे पोटकालवे काही ठिकाणी बुजून गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT