स्ट्राॅबेरीची रोपे लागवडीसाठी तयार
स्ट्राॅबेरीची रोपे लागवडीसाठी तयार 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात स्ट्रॅाबेरी लागवडपूर्व कामे वेगात सुरू

टीम अॅग्रोवन

सातारा  ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्र्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीच्या लागवडपूर्व कामांना गती आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीची मशागत करणे, मल्चिंग, बेड सोडणे आदी कामांमध्ये शेतकरी सध्या व्यस्त असल्याचे चित्र महाबळेश्र्वर तालुक्यात दिसत आहे.

महाबळेश्र्वर तालुक्यात मागील तीन महिन्यांत जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिके कुजून नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या स्ट्रॅाबेरी लागवड काळात निसर्गाकडून साथ मिळत आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्याने लागवडपूर्व कामांना चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जमीन मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये नांगरट, बेड सोडणे, मल्चिंग यासह रोपे ट्रेमध्ये तयार करून ठेवण्यात आली आहेत, तसेच पाण्यासाठी ठिबक सिंचन संच बसविण्याचे कामे सुरू आहेत. एकूणच तालुक्यातील शेतकरी स्ट्रॅाबेरी पिकाच्या कामात व्यस्त झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

रोपेनिर्मितीसाठी महाबळेश्र्वर तालुक्यात सुमारे १२ लाख मातृरोपे आली होते. यापासून सहा कोटींवर रोपे तयार झाल्याचा अंदाज आहे. या रोपांतून एकट्या महाबळेश्र्वर तालुक्यात अडीच हजार एकरांवर स्ट्रॅाबेरी लागवड होईल, असे शेतकरी सांगत आहेत. पुढील आठवड्यापासून स्ट्रॅाबेरी लागवडीस गती येईल. खरिपातील भात, बटाटा, नाचणी आदी पिकांचे अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता सर्व भिस्त स्ट्रॅाबेरी पिकावर आहे. महाबळेश्र्वरबरोबरच जावळी, वाई, खटाव, सातारा या तालुक्यांतही स्ट्रॅाबेरी लागवड होत असते. येथेही मशागतीची कामे सुरू झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT