स्ट्राॅबेरी महोत्सवाचे उदघाटन
स्ट्राॅबेरी महोत्सवाचे उदघाटन 
मुख्य बातम्या

स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा : डॉ. सरकाळे

टीम अॅग्रोवन

भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा येथील तांबड्या मातीचे प्रतिबिंब आहे. सध्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर देत ‘रेसिड्यू फ्री'' पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथे शुक्रवारी स्ट्रॉबेरी ग्रोव्हसर्स असोसिएशन, श्रीराम फळ प्रक्रिया संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सव २०१९’च्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. सरकाळे बोलत होते. या वेळी प्रगतशील शेतकरी बाबुराव गनू भिलारे, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपूरे, आनंदा भिलारे, संतोष रांजणे, राजेंद्र भिलारे, शरद चौधरी, जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक आर. एम. भिलारे, उपसरपंच अनिल भिलारे, नितीन भिलारे, महेश रसाळ, शिवाजी भिलारे व स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी बाळासाहेब भिलारे म्हणाले, की भिलारच्या परंपरेला साजेसा असा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येत असून, स्ट्रॉबेरी या फळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांची आर्थिक उन्नती व्हावी हाच उद्देश या महोत्सवाचा आहे. यावेळी नितीन भिलारे यांनी स्वागत केले.  

स्ट्रॉबेरी अन्‌ मासे पकडण्याची मजा  दरम्यान, किंगबेरी येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी कमान उभारली आहे. या ठिकाणी स्ट्रॉबेरी, जॅम, जेली, सिरप, मसाले, स्ट्रॉबेरी रोपे यांचे विविध स्टॉल्स उभारले आहेत. तसेच शेतातील स्ट्रॉबेरी, तळ्यातील मासे पकडण्याची मजा या ठिकाणी पर्यटक लुटताना दिसत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT