Stormy winds in Nanded, Hingoli, Parbhani districts, loss of crops due to rain
Stormy winds in Nanded, Hingoli, Parbhani districts, loss of crops due to rain 
मुख्य बातम्या

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत सोमवारी (ता. २) सकाळ आठपर्यंतच्या २४ तासांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. ऐन सुगीमध्ये अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली.

वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू आदी उभी पिके आडवी झाली. काढणी सुरू असेलला हरभरा, गहू आदी पिकांचे भिजून नुकसान झाले. संत्रा फळपिकांच्या फांद्या मोडल्या. आंब्याचा मोहर गळून पडला. सध्या रब्बी पिकांची सुगी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतित आहेत.

नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. १) सायंकाळच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस झाला. किनवट, माहूर, हियामतनगर, हदगाव, मुदखेड, लोहा आदी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील झरी, दैठणा, पोखर्णी, ब्रम्हपुरी, गंगाखेड, पालम, मानवत, आदी गावांच्या परिसरात, पूर्णा, मानवत तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील संत्र्याचे मोठे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT